You don't have javascript enabled. Please Enabled javascript for better performance.

Cashless Campus Challenge

Start Date: 26-09-2017
End Date: 01-01-2018

भारताचे पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्र मोदी यांनी दिलेले "डिजिटल ...

See details Hide details
बंद
क्रेडिट तास:
10

भारताचे पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्र मोदी यांनी दिलेले "डिजिटल इंडिया" चे उद्दिष्ट पुढे ठेवून, तसेच महाराष्ट्र राज्यात कॅशलेस व्यवहारास अधिक प्रोत्साहन व बळकटी देण्याकरिता "आव्हान कॅशलेस कॅम्पसचे" हि स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. जी महाविद्यालये हे आव्हान पूर्ण करतील त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे सन्मानित करण्यात येईल.

काय आहे हे आव्हान?
महाविद्यालयाच्या परिसरात ज्या ठिकाणी रोख रकमेची देवाणघेवाण करण्यात येते, अश्या ठिकाणी कॅशलेस व्यवहाराची सुविधा उपलब्ध करून देणे, हे या आव्हानाचे मुख्य उद्दिष्ट्य आहे. तुमच्या महाविद्यालयात अशी सुविधा उपलब्ध असल्यास त्याची माहिती आम्हाला कळवा. जर अशी सुविधा उपलब्ध नसेल तर या आव्हानाचा फायदा घ्या आणि आपल्या महाविद्यालयात हि सुविधा उपलब्ध करून द्या. या आव्हानामध्ये आपल्या महाविद्यालयामधील पुढील ठिकाणी सुविधा उपलब्ध असल्याची सुनिश्चिती करून द्यायची आहे -
➢ महाविद्यालयातील फी स्वीकारण्यात येणारे काउंटर
➢ महाविद्यालयातील उपहारगृहे, स्टेशनरी व इतर दुकाने
एकदा वर नमूद केलेल्या ठिकाणी वापरात असलेली कॅशलेस व्यवहाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली की या ठिकाणी उपलब्ध असलेल्या सुविधांचा योग्य त्या प्रकारे (निर्देश पुढे दिलेले आहेत) फोटो काढून आमच्याकडे पाठवा. जी महाविद्यालये हे आव्हान यशस्वीरीत्या पुर्ण करतील त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे सन्मानित करण्यात येईल.

आव्हान पूर्ण करण्यासाठीची मार्गदर्शकतत्वे


आव्हानपुर्तीकरिता अर्ज करा.

अस्विकरण: स्थायी समिती पुरवण्यात आलेल्या माहितीची सत्यता तपासणार आहे. तथापी, नकली अथवा चुकीची माहिती आढळल्यास त्यास MyGov पोर्टल जबाबदार राहणार नाही.

Total Submissions ( 50) Approved Submissions (2) Submissions Under Review (48) Submission Closed.
Reset
1 Record(s) Found
200

AKSHAY PRAKASH BHARSAKALE 6 years 6 months ago

Taking the mission given by the Honourable Prime Minister Shri. Narendra Modi forward, CASHLESS CAMPUS CHALLENGE is being organized as another step in empowering cashless economy ...