You don't have javascript enabled. Please Enabled javascript for better performance.

Maharashtra Mission Plantation Activities - #EachOnePlantOne

Start Date: 01-07-2017
End Date: 08-07-2017

येत्या १ ते ७ जुलै दरम्यान महाराष्ट्रात ४ कोटी रोपे लावण्याचा ...

See details Hide details
बंद
क्रेडिट तास:
10

येत्या १ ते ७ जुलै दरम्यान महाराष्ट्रात ४ कोटी रोपे लावण्याचा निर्धार राज्य शासनाने केला आहे. जनतेच्या मोठ्या सहभागातून राज्यातील हरित भूभाग वाढवण्यासाठी हाती घेतली ही मोहीम आपण यशस्वी बनवूया.

१ ते ७ जुलै, २०१७ दरम्यान आपण वैयत्तिक किंवा गटागटाने वृक्षारोपण करून या मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग नोंदवू शकता. आपण केलेल्या वृक्षारोपणाची छायाचित्रं तसेच व्हिडिओ आमच्याबरोबर माय गव या संकेतस्थळावर शेअर करू शकता. आम्हाला आपल्या देशातील हरित भूभाग वाढवण्यासाठी काम करणाऱ्या नागरिकांचा योग्य तो सन्मान करायचा आहे व त्यासाठी माय गव येथे येणाऱ्या सर्वोत्तम छायाचित्रांचे महाराष्ट्र वन विभाग प्रदर्शन भरवेल.

सादरीकरणाच्या श्रेणी:
१. छायाचित्रे - वैयक्तिक किंवा कोलाज पद्धतीने
२. व्हिडिओ - २ मिनिटांची मर्यादा

मार्गदर्शक तत्वे:
१. छायाचित्रे, व्हिडिओ इ. महाराष्ट्र माय गव येथेच सादर करावीत.
२. १ ते ७ जुलै २०१७ दरम्यान करण्यात येणारे वृक्षारोपणच स्पर्धेसाठी ग्राह्य मानले जाईल. स्पर्धकांनी कृपया ही बाब ध्यानात घ्यावी.
३. आपण सादर करत असलेल्या सर्व छायाचित्रांचे आणि व्हिडिओचे १०० शब्दांमध्ये मराठी, इंग्रजी किंवा हिंदी मध्ये वर्णन करावे. आपण देत असलेल्या वर्णनात वृक्षारोपणाची तारीख, स्थळ, लावलेल्या रोपांची संख्या व रोपाची प्रजाती याची माहिती नमूद करावी.
४. व्हिडिओ तयार करू इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी २ मिनिटांचा व्हिडिओ तयार करून तो युट्युब या संकेतस्थळावर अपलोड करावा. त्यानंतर व्हिडिओ लिंक महाराष्ट्र माय गव या संकेतस्थळावर शेअर करावी.
५.आपण सादर करत असलेली छायाचित्रे, व्हिडिओ यांचा उपयोग महाराष्ट्र शासन व वन विभाग वृक्षारोपण मोहिमेच्या प्रचारासाठी किंवा हरित भारताच्या अन्य कामांसाठी करू शकतात याची नोंद सहभागी स्पर्धकांनी घ्यावी. वरील बाबीशी आपण सहमत आहात असे आम्ही मानतो.
६. छायाचित्रे, व्हिडिओ नाकारण्याचा अधिकार महाराष्ट्र शासनाला असेल.
७. स्पर्धेमध्ये सहभागी होणारे स्पर्धक पुढील बाबींशी सहमत आहेत असे मानण्यात येईल: अ. स्पर्धेच्या सर्व अटींचे मी पालन केले आहे. ब. माझे/आमचे सादरीकरण मूळ कलाकृती आहे. सी. माझे/आमचे सादरीकरण कोणत्याही तिसऱ्या पक्षाच्या बौद्धिक संपत्ती अधिकारांचे उल्लंघन करीत नाही.
८. सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी आपली संपर्क माहिती अचूक आणि अद्ययावत ठेवली पाहिजे.
९. स्पर्धेचा सर्व किंवा काही भाग रद्द करण्याचा तसेच त्यामध्ये काही बदल करण्याचा संपूर्ण अधिकार महाराष्ट्र शासनाला असेल.
१०. स्पर्धकांना आपले व्हिडिओ, छायाचित्रे स्पर्धेच्या कालखंडात महाराष्ट्र माय गव या संकेतस्थळावर सादर करता न आल्यास त्यासाठी महाराष्ट्र शासन जबाबदार राहणार नाही.

Total Submissions ( 6) Approved Submissions (3) Submissions Under Review (3) Submission Closed.