You don't have javascript enabled. Please Enabled javascript for better performance.

Logo Designing Competition for Jalyukta Shivar Abhiyan

Start Date: 31-10-2017
End Date: 30-11-2017

महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ ...

See details Hide details
बंद
क्रेडिट तास:
10

महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ पर्यंत महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याच्या उद्देशाने जलयुक्त शिवार अभियान या महत्त्वपूर्ण योजनेची दिनांक ५ डिसेंबर २०१४ रोजी घोषणा केली.
विकेंद्रित पाणी साठे निर्माण करून जमिनीतील आर्द्रता संरक्षित करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. गेल्या २ वर्षांमध्ये ११,४९३ गावांमध्ये जलसंधारणाची ४,०१, ६०९ कामे पूर्ण झाली आहेत. या अभियानास शेतकऱ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळालेला असून स्थानिकांच्या सहभागातून झालेल्या कामांची किंमत रु. ५७० कोटींपेक्षा अधिक आहे. कामांच्या नियोजनात, अंमलबजावणीत आणि संनियंत्रणातही नागरिकांचा सहभाग घेतला जातो. एखाद्याशासकीय योजनेला अशाप्रकारे लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे फारच अभावाने पहावयास मिळते.
विविध ८ विभागांतर्गत असलेल्या १३ योजनांच्या समन्वयातून एकात्मिक पद्धतीने जलयुक्त शिवार अभियानाची अंमलबजावणी होते. गेल्या २ वर्षातील जलयुक्त शिवार अभियानाच्या अंमलबजावणीमुळे भूजल पातळी, पाणी साठवण क्षमता, फलोत्पादन क्षेत्र, पिकांची उत्पादन क्षमता, चारा उत्पादन आणि जमिनीची आर्द्रता यामध्ये वाढ झाल्याचे पहावयास मिळते. गेल्या २ वर्षात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून १५,७५,३८६ टीसीएम पाण्याचा साठा निर्माण होऊन २१,२१,२७८ हेक्टर जमिनीला सिंचित करण्याची क्षमता निर्माण झाल्याचा अंदाज आहे.

महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून नागरिकांना जलयुक्त शिवार अभियानासाठी लोगो तयार करण्याच्या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

स्पर्धेचा कालावधी १ नोव्हेंबर २०१७, सकाळी ११.०० ते ३० नोव्हेंबर २०१७ संध्याकाळी ५.०० पर्यंत

विजयी लोगोस रु. १०,००० रोख रकमेचे बक्षिस दिले जाईल व सदर लोगो जलयुक्त शिवार अभियानाचा अधिकृत
लोगो
म्हणून वापरला जाईल.

स्पर्धेच्या अटी, शर्ती आणि तांत्रिक बाबी यासाठी येथे क्लिक करा.

Total Submissions ( 398) Approved Submissions (15) Submissions Under Review (383) Submission Closed.
Reset
1 Record(s) Found