You don't have javascript enabled. Please Enabled javascript for better performance.

५८व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन

बारामती येथील श्री. अप्पासाहेब पवार सभागृहात पार
पडलेल्या दिमाखदार समारंभात विद्यार्थी विभागाच्या
५८व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे उदघाटन
ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामतीचे चेअरमन श्री.
राजेंद्रदादा पवार यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून
झाले.मान्यवरांच्या स्वागतानंतर प्रदर्शनाच्या स्मरणिकेचे
प्रकाशन झाले. यावर्षी चित्रकला, शिल्पकला,
वस्त्रसंकल्प, मातकाम, धातुकाम अंतर्गत गृहसजावट,
उपयोजित कला, कला शिक्षक प्रशिक्षण, असे सर्व
विभाग मिळून एकूण पाच हजार तीनशे चोवीस
कलाकृती राज्यकला प्रदर्शनासाठी आठशे एकोणसाठ
कलाकृतींची निवड करण्यात केली आहे. त्यापैकी सात
विभागातून एकतीस कलाकृतींना रोख पारितोषिके व
अडतीस कलाकृतींना गुणवत्ता प्रमाणपत्रे यावर्षी प्रदान
करण्यात आली.

...