You don't have javascript enabled. Please Enabled javascript for better performance.

‘Khoj – Search for Innovativeness’ Logo Design Competition

Start Date: 08-01-2018
End Date: 20-01-2018

नाविन्यता ही काळाची गरज आणि ओळख दोन्ही आहे व महाराष्ट्र हे प्रत्येक ...

See details Hide details
बंद
क्रेडिट तास:
10

नाविन्यता ही काळाची गरज आणि ओळख दोन्ही आहे व महाराष्ट्र हे प्रत्येक क्षेत्रातील विकासाकरिता नाविन्यतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याचा प्रसार करण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे.

असंख्य स्थानिक नाविन्यपूर्ण कल्पना तळागाळात जन्म घेत असतात, त्यापैकी काही कल्पनांमध्ये इतकी ताकद असते की त्या जर नागरिक आणि प्रशासनाच्या एकत्रित प्रयत्नांसह प्रदेशभर अंमलात आणल्या गेल्या तर संपूर्ण समस्या मुळापासून सोडवू शकतात. डोंगराएवढ्या समस्यांवर उपाय ठरतील अश्या स्थानिक नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रकाशझोतात आणण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, श्री. आशुतोष सलील यांनी ही अजोड संधी ओळखली आणि ‘खोज - शोध नाविन्याचा’ चा जन्म झाला.

‘खोज - शोध नाविन्याचा’ हा असा एक उपक्रम आहे जो संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबविल्या जाऊ शकतात अशा नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबविला जाईल. ही एक अशी स्पर्धा आहे जी चंद्रपूरच्या नागरिकांना जिल्ह्यातील समस्यांवर उपाय सादर करण्याची संधी देईल आणि अशा प्रकारच्या प्रत्यक्षात येऊ शकणाऱ्या कल्पनांच्या शिल्पकारांचा सत्कार करेल. ‘खोज - शोध नाविन्याचा’ हे माध्यम चंद्रपूर बाहेरील नागरिकांना देखील जिल्ह्यातील स्थानिक समस्यांवरील त्यांच्या कल्पनात्मक उपायांसह स्पर्धेत सहभागी होण्याची संधी देईल.

ही दोन फेऱ्यांमध्ये पार पडणारी स्पर्धा आहे:
पहिली फेरी – कल्पना सादर करणे
दुसरी फेरी – कल्पनेवर आधारित दृक्श्राव्य माध्यमांवरील लघु सादरीकरण

खालील श्रेणींसाठी उपाय आणि नाविन्यपूर्ण कल्पना या स्पर्धेचा केंद्रबिंदू आहेत
१) कृषी
२) पशुसंवर्धन
३) जीवनमान विकास
४) आरोग्यसेवा
५) पाणी व स्वच्छता
६) पर्यटन विकास
७) प्रशासनातील तंत्रज्ञान

विजेत्यांचा वित्त व नियोजन आणि वनमंत्री माननीय सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी आणि जिल्हा मुख्यालयातील इतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला जाईल.

महाराष्ट्र सरकार तुम्हाला या उपक्रमामध्ये सहयोग देण्यासाठी आमंत्रित करत आहे. बोधचिन्ह रेखाटन स्पर्धेत भाग घेऊन जिल्ह्यातील समस्या दूर करण्यासाठी प्रभावी ठरू शकतील अश्या स्थानिक स्तरावरील आणि तळागाळातील नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘खोज - शोध नाविन्याचा’ उपक्रमाचे प्रतिनिधित्व करेल असे बोधचिन्ह निर्माण करण्यासाठी आम्हाला सहाय्य करा,

बोधचिन्ह सादर करण्याची अंतिम तारीख : २० जानेवारी २०१८

विजेत्या प्रवेशिकेचा रोख दहा हजार रुपये देऊन सत्कार केला जाईल आणि ते बोधचिन्ह ‘‘खोज - शोध नाविन्याचा’’ उपक्रमाचे अधिकृत बोधचिन्ह म्हणून वापरले जाईल.

स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी स्पर्धेसाठीच्या अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचा.

टीप – महाराष्ट्र मायगाव संकेतस्थळाच्या माध्यमातून सादर केलेल्या प्रवेशिकाच ग्राह्य धरल्या जातील.

Total Submissions ( 60) Approved Submissions (0) Submissions Under Review (60) Submission Closed.