You don't have javascript enabled. Please Enabled javascript for better performance.

'Khoj - Search for Innovation'

Start Date: 04-03-2018
End Date: 08-04-2018

आपणाकडून प्राप्त झालेल्या प्रवेशिकांबद्दल धन्यवाद! ...

See details Hide details
बंद
क्रेडिट तास:

आपणाकडून प्राप्त झालेल्या प्रवेशिकांबद्दल धन्यवाद!
प्राप्त झालेल्या प्रवेशिका तपासणे चालू आहे. स्पर्धेचा निकाल १५ मे ते २० मे, २०१८ च्या दरम्यान प्रसिद्ध करण्यात येईल

‘खोज’ काय आहे ?
‘खोज’ हा चंद्रपुरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फ़त हाती घेण्यात आलेला एक स्तुत्य उपक्रम आहे. ही एक अशी स्पर्धा आहे ज्या माध्यमातून नागरिक चंद्रपुरसाठी त्यांच्या डोक्यात असलेल्या नाविन्यपूर्ण कल्पना मांडू शकतात. जर तुमच्याकडे एखादी नाविन्यपूर्ण कल्पना असेल अथवा तुमच्याकडे असणाऱ्या संकल्पनेची तुम्ही यापूर्वीच विद्यमान प्रणाली सुधारण्यासाठी अंमलबजावणी केली असेल तर पुढे या आणि या स्पर्धेत सहभागी व्हा. आम्ही चार श्रेणींमधुन तुमच्या कल्पनांचा शोध घेऊ आणि या प्रत्येक श्रेणी अंतर्गत विशेष विषय समाविष्ट असतील. आम्ही प्रत्येक विषयाची विस्तृत माहिती दिली असून आता त्यावर पुढील उपाययोजना आपण सुचवाव्यात अशी आम्ही आपणास विनंती करतो.

हि स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये पार पडणार आहे:
१. कल्पना पाठवणे
२.चंद्रपूर येथे कल्पनेवर सादरीकरण

स्पर्धेअंतर्गत खालील चार श्रेणींमधुन आपल्या कल्पनांचा शोध घेतला जाणार आहे. प्रत्येक श्रेणींची विस्तृत माहिती दिली असून आता त्यावर पुढील उपाययोजना आपण सुचवाव्यात अशी आम्ही आपणास विनंती करतो.

१. कृषी
✓ लघु आणि किरकोळ जमीनीची उत्पादकता वाढविण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना : चंद्रपूर मधील ६९.३% शेतकऱ्यांकडे ०-२ एकर जमीन आहे. आम्ही अश्या एका नाविन्यपूर्ण उपायाच्या शोधात आहोत जी शेतकऱ्यांना या लहान जमिनींवर जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी मदत करेल. उदा: एकात्मिक शेती पद्धत : कृषीला पशुपालन, मस्त्यपालन, कुकुटपालनाची जोड देता येऊ शकते.
✓ बहुपिके : येथील प्रमुख पिके आहेत भात, कापूस आणि सोयाबीन. बहुतेक शेतकरी वर्षाला केवळ एकच (खरीप) पिक घेतात आणि शेतकऱ्यांच्या कमी उत्पन्नाचे हेच महत्त्वाचे कारण आहे. बहुपिके घेण्यासाठी आम्हाला तुमच्या कल्पनेची गरज आहे.
✓ भाज्या आणि फळे उत्पादन : आम्हाला अश्या कल्पनांची गरज आहे ज्या माध्यमातून फळे आणि भाज्या उत्पादनाला चालना मिळेल. चंद्रपूर मध्ये भाज्या आणि फळांचे सध्या १% पेक्षाही कमी उत्पादन घेतले जाते.
✓ लागवडीचा खर्च कमी करणे: सध्या शेतकऱ्यांना लागवडीसाठी मोठा खर्च करावा लागतो. उदा. १ क्विंटल कापसाच्या लागवडीचा खर्च आहे ३००० रुपये आणि मिळणारा बाजार भाव आहे फक्त ४५०० रुपये, म्हणून खालील उपाययोजनांच्या आधारे आम्ही लागवडीचा खर्च कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत.
o लघु सिंचनाचा वापर
o यांत्रिकीकरणाची ओळख
o खते आणि कीटकनाशकांपासून सुटका

२.जीवनमान विकास
चंद्रपूर हा खनिज आणि वन्यसृष्टीने संपन्न असा प्रदेश असूनही नागरिकांना जगण्यासाठी योग्य ती तरतूद करण्यासाठी झगडावे लागते. यावर उपाय म्हणून खालील विषयांवर आम्ही तुमच्या कल्पना मागत आहोत:
✓ दुध पूरक शेतीला चालना: चंद्रपूरमध्ये १६०० लिटर पेक्षा जास्त दुधाचा तुटवडा आहे आणि दुध विकत घेणाऱ्यांची संख्या अतिशय जास्त आहे. चंद्रपूर मधील दुध व्यवसाय कसा वाढवावा?
✓ कुकुटपालन आणि मेंढीपालन : कुकुटपालन आणि मेंढीपालनाला चालना दिल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. या क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी शाश्वत पद्धती राबविण्यासाठी आम्हाला तुमच्या कल्पना कळवा.
✓ प्रक्रीयेच्या माध्यमातून मूल्य वाढवणे : शेती आणि वन्य क्षेत्रातून मिळणाऱ्या कच्च्या मालापासून निर्माण होणाऱ्या उत्पादनांचे रूप पालटून त्याचे मूल्य वाढवण्यास विपुल वाव आहे. यात प्रक्रिया, पॅकेजिंग आणि विपणन याचा समावेश आहे. उदा. कापूस, डाळ कारखाने, बांबूची उत्पादने.

३.पर्यटन विकास
चंद्रपूर जिल्हा ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पासाठी ओळखला जातो. तरीही ताडोबा वगळता अशी अनेक ठिकाणे आहेत जेथे पर्यटनाच्या माध्यमातून विकास केला जाऊ शकतो.
✓ इको पर्यटनाला सुरुवात : चंद्रपूरमध्ये सर्वांगीण सुंदर वन्यसंपत्ती आहे. येथे इकोपर्यटनाला अतिशय वाव आहे. या क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारने काय केले पाहिजे?
✓पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती : आम्हाला असे मार्ग सुचवा ज्या माध्यमातून स्थानिक तरुण वर्ग पर्यटनावर आधारित रोजगाराच्या संधी मिळवू शकतो.
✓ चंद्रपूरचे ब्रँडिंग करणे : ताडोबा अभयारण्याला भेट देण्यासाठी चंद्रपूरमध्ये जगभरातून पर्यटक येतात. पण या व्यतिरिक्त चंद्रपूरमध्ये लक्षणीय ऐतिहासिक ठिकाणे आहेत, ज्यातून गोंड, भोसला या जमातीच्या संस्कृतीचे दर्शन होते. इतकी विविधता असूनही चंद्रपूर आजही पर्यटन क्षेत्रात पाय रोवू शकलेले नाही. चंद्रपूरला पर्यटनात एक ब्रँड म्हणून विकसित कसे केले जाऊ शकते यावर आम्हाला तुमच्या कल्पनांची गरज आहे.
✓ पर्यटन अनुभव सुधारणे : चंद्रपुरात येणाऱ्या पर्यटकांचा पर्यटन अनुभव अविस्मरणीय करता यावा यासाठी खूप काही करण्यासारखे आहे. जसे कि वाहतूक, खाद्यपदार्थ, धावती भेट, राहण्याची व्यवस्था आणि सोयी, मार्गदर्शन व्यवस्थापन इत्यादींमध्ये सुधारणा. आम्हाला असे मार्ग सुचवा ज्यातून पर्यटन अनुभव अविस्मरणीय करता येईल.

४.प्रशासनातील प्रक्रिया सुधारणा
बऱ्याचदा सरकारी कामकाजात विविध संस्थांचा समावेश असल्याने कामकाज प्रक्रिया लांबलचक असतात, यात सुधारण करण्यास खूप वाव आहे. या प्रक्रियांमध्ये बऱ्याचदा फारच कमी तंत्रज्ञानाचा वापर होत असतो. त्यामुळेच जबाबदारी, पारदर्शकता सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे, माहिती व्यवस्थापन सुधारणे यांसारख्या गोष्टींचा समावेश केला जाऊ शकतो. खालील क्षेत्रांमध्ये आम्ही तुमच्याकडून कल्पना मागवत आहोत:
✓ सरकारी योजना पोचाव्यात यासाठी प्रभावी माध्यम : हे वारंवार लक्षात येत आहे की सरकार त्यांच्या शासकीय योजना लोकांपर्यंत पोचवण्यात कमी पडत आहे. आपण यात कशी सुधारणा करू शकतो?
✓ प्रशासनातील तक्रार निवारण : नागरिकांना जेव्हा एखाद्या समस्येबद्दल तक्रार असते तेव्हा त्या विरोधात आवाज उठवून त्याचे निवारण मिळवण्यात त्यांना बऱ्याच अडचणी येतात. चंद्रपूरच्या नागरिकांसाठी ‘हॅलो चंदा’ या नावाने एक तक्रार निवारण प्रणाली कार्यरत आहे, कृपया आम्हाला तुमच्या कल्पना कळवा ज्यायोगे आम्ही या प्रणालीमध्ये सुधारणा करू शकतो किंवा दुसरा एखादा मार्ग आम्हाला सुचवा.
✓ प्रशासकीय संस्कृती: एखाद्या संस्थेची कामकाज संस्कृती कशी आहे यावरून त्या संस्थेची कार्यक्षमता ठरते. आपण कर्मचाऱ्यांचा सहभाग कसा वाढवू शकतो आणि अधिक प्रभावीपणे कार्य करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणारी प्रणाली कशी उभारु शकतो?

विजेत्या कल्पना
✓ प्रत्येक श्रेणीमध्ये खालीलप्रमाणे दोन प्रकारच्या कल्पनांचा समावेश आहे:
✓ अंमलबजावणी करण्यात आलेल्या कल्पना : ज्या स्पर्धकांनी यशस्वीपणे त्यांच्या कल्पनांची अंमलबजावणी करून त्या प्रत्यक्षात उतरविल्या आहेत.
✓ नवीन कल्पना : ज्या स्पर्धकांकडे नवीन कल्पना आहेत ज्यांची अजून अंमलबजावणी झालेली नाही.
✓ प्रत्येक श्रेणीमध्ये दोन्ही गटांतील विजेते आणि उपविजेते घोषित करण्यात येतील.
✓ विजेत्यांना आणि उपविजेत्यांना रोख रक्कम, मानचिन्ह आणि एका प्रमाणपत्र प्रदान केले जाईल. रोख पारितोषिके खालीलप्रमाणे आहेत:
o विजेता - ₹10,000
o उपविजेता - ₹5000

स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख: ७ एप्रिल २०१८

'खोज' ची संपुर्ण प्रक्रिया जाणुन घेण्यासाठी येथे क्लिक करा.

ऑफलाईन अर्ज: ऑफलाईन फॉर्म डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
हा फॉर्म भरून आपल्याला खालील पत्त्यावर पाठवायचा आहे.
मुख्यमंत्री फेलोस सेक्शन, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर ४४२४०१

ऑनलाईन अर्ज: ऑनलाईन पध्द्तीने कल्पना सादर करण्यासाठी खालील फॉर्म भरा.

Total Submissions ( 122) Approved Submissions (0) Submissions Under Review (122) Submission Closed.