युवक हे या देशाचे भविष्य आहेत. राष्ट्राच्या उभारणीत या युवा शक्तीचा विधायक सहभाग राहणे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
दर्जेदार शिक्षणाची उपलब्धता, कौशल्य विकास, रोजगाराच्या संधी, स्वयंरोजगारासाठी भांडवल उपलब्धता या सर्वांची खात्री युवकांना द्यायची आहे. महाराष्ट्रातील युवक भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी सक्षम असावयास हवा.
शासनाने युवकांना राज्याच्या विकासात कसे सहभागी करून घ्यावे या संदर्भातील आपल्या सूचना अवश्य कळवा.
P. D. DRDA 9 years 2 months ago
मा मुख्यमंत्री साहेब या स्पर्धा युगात पुस्तकांच्या किमती खुप वाढ झाली आहे कृपया किमतीवर निर्बंध लावावेत म्हणजे गरीब व मध्यम वर्गीय जनता स्पर्धा पुस्तके घेवू शकतील कृपया लक्ष घालावे.