पावसाची अनियमितता व पावसातील खंड यामुळे सतत टंचाई सदृश परिस्थिती निर्माण होऊन त्याचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होत आहे. टंचाई परिस्थिती निर्माण झाल्यानंतर करावयाच्या उपाय योजनांसोबतच दुष्काळावर कायमस्वरूपी उपाय योजण्यावर आपल्या सरकारचा भर राहणार आहे.
पाण्याच्या शाश्वत उपलब्धतेसाठी जलसंधारणाच्या सर्व उपाययोजना एकात्मिक पद्धतीने सर्व विभागांच्या समन्वयाने राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. यासाठी जल युक्त शिवार अभियानांतर्गत नियोजनबद्ध कृती आराखडा तयार करण्यात आलेला असून २०१९ पर्यंत महाराष्ट्र टंचाई मुक्त करण्याचे उद्दिष्ट आपण ठेवलेले आहे.
पहिल्या वर्षी ५ हजार गावे टंचाई मुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. अभियानांतर्गत पावसाचे जास्तीतजास्त पाणी गावाच्या शिवारातच अडवून भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ केली जाईल.
अधिक माहितीसाठी:
https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Engl...
Ratiram Vithobaji Rewatkar 9 years 2 months ago
भुगर्भातील पाण्याची पातळी खोल गेली आहे त्यामुळै ती पातळी वाढविणे महत्वाचे आहे.त्याकरिता उपाययोजना करावी.पाण्याचा अर्निबंध होणारा उपसा थांबवावा.पाण्याचा वापर मर्यादित करावा.नैसर्गिक जलस्ञोत खुले करावे.पावसाच्या पाण्याचा थेंब न थेंब अडवून जमिनीत जिरवण्यासाठी उपाययोजना करावी.रेनवाटर हार्वेस्टिंग करावे.