You don't have javascript enabled. Please Enabled javascript for better performance.

माझ्या सर्वोत्कृष्ट प्रवासाची गोष्ट – चित्रफित (व्हिडिओ) स्पर्धा

माझ्या सर्वोत्कृष्ट प्रवासाची गोष्ट – चित्रफित (व्हिडिओ) स्पर्धा ...

See details Hide details
बंद
क्रेडिट तास:
10

माझ्या सर्वोत्कृष्ट प्रवासाची गोष्ट – चित्रफित (व्हिडिओ) स्पर्धा
दिनांक ५ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर, २०१७ या कालावधीत, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ साजरा करत आहेत 'पर्यटन पर्व'. आपणही या उत्सवात सहभागी व्हा आणि महाराष्ट्रातील पर्यटन विविधतेचा आनंद घ्या.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे “माझ्या सर्वोत्कृष्ट प्रवासाची गोष्ट” हि चित्रफित (व्हिडीओ) स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आपल्या प्रवासाची गोष्ट सांगणारी चित्रफित आपल्याला विशेष शैलीत तयार करून पाठवायची आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ नागरिकांना महाराष्ट्राच्या विविधतेची सुंदरता दर्शवणाऱ्या चित्रफिती बनवण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. या उपक्रमामार्फत पर्यटन विभागाला नवीन व उदयोन्मुख प्रवासाच्या ठिकानांबद्दल माहिती मिळण्यास मदत होईल.

या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता आपली चित्रफित (व्हिडीओ) YouTube वर अपलोड करा आणि या व्हिडिओची लिंक https://maharashtra.mygov.in या संकेतस्थळावर पाठवा.

सर्वोत्कृष्ट तीन चित्रफितींना पुरस्कृत करण्यात येईल.

चित्रफितीचा कालावधी: ३० ते ९० सेकंद

पुरस्कार:
पहिला पुरस्कार : महाराष्ट्र शासनाच्या MTDC रिसोर्टमध्ये २ रात्री ३ दिवसांची राहण्याची व्यवस्था – २ कुटुंबाकरिता [४ प्रौढ व्यक्ती, ४ लहान मुले १२ वर्षाखालील]
दुसरा पुरस्कार : महाराष्ट्र शासनाच्या MTDC रिसोर्टमध्ये २ रात्री ३ दिवसांची राहण्याची व्यवस्था – १ कुटुंबाकरिता [२ प्रौढ व्यक्ती, २ लहान मुले १२ वर्षाखालील]
तिसरा पुरस्कार : महाराष्ट्र शासनाच्या MTDC रिसोर्टमध्ये १ रात्र २ दिवसांची राहण्याची व्यवस्था – १ कुटुंबाकरिता [२ प्रौढ व्यक्ती, २ लहान मुले १२ वर्षाखालील]

स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी स्पर्धेसाठीच्या अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचा.

Total Submissions ( 21) Approved Submissions (21) Submissions Under Review (0) Submission Closed.
Reset
1 Record(s) Found