You don't have javascript enabled. Please Enabled javascript for better performance.

वृक्षरोपणाची मोहीम

देशातील ३३% भौगोलिक भूमी वनांसाठी राखीव ठेवणे हा राष्ट्रीय वन धोरणाचा एक प्रमुख भाग आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र वन विभागाने वनमहोत्सवांतर्गत ४ कोटी रोपे राज्यभरात १ ते ७ जुलै दरम्यान लावण्याचा निर्णय घेतला आहे.  

वृक्षारोपणाची मोहीम २०१६ मध्ये देखील हाती घेण्यात आली होती व मागील वर्षी एका दिवसात २.८२ कोटी रोपटी राज्यात लावण्यात आली. २०१७, २०१८ व २०१९ मध्ये राज्यात प्रत्येकी ४ कोटी, १३ कोटी व ३३ कोटी रोपटी लावण्याचे ध्येय वन विभागाने ठेवले असून यामार्फत महाराष्ट्रात एकूण ५० कोटी रोपटी लावण्यात येतील.

२०१७ मध्ये ४ कोटी रोपटी लावण्यात येतील व या वनमहोत्सवात राज्य शासनाचे ३३ विभाग, विविध शाळा तसेच महाविद्यालयांचे विद्यार्थी, एनएनएस, एनसीसी, सीएसआर, रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, रक्षा विभाग, नाबार्ड यांचा देखील सहभाग असेल.   

वृक्षारोपण मोहिमेविषयी माहिती देण्यासाठी १९२६ या टोल फ्री क्रमांकावर 'हॅलो फॉरेस्ट' ही हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. वन विभागाने 'माय प्लांट्स' नावाचे एक मोबाईल अॅप देखील तयार केले असून त्यात वृक्षांची संख्या, जागा व प्रजाती याची नोंदणी केली जाऊ शकते. हे अॅप सर्व कार्यकर्त्यांनी वापरावे व लावलेल्या वृक्षांची तेथे नोंद करावी.

महाराष्ट्र वन विभागाने महाराष्ट्र हरित सेना/ ग्रीन आर्मी तयार केली असून त्यातील कार्यकर्ते वृक्षारोपण, वनांचे व वन्यजीवांचे संरक्षण यांसारखी विविध कार्ये करतात. या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा असल्यास ग्रीन आर्मीच्या संकेतस्थळावर नावनोंदणी करा - www.greenarmy.mahaforest.gov.in   

 

ग्रीन आर्मीसाठी नावनोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा

AND

माय प्लांट्स अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा