You don't have javascript enabled. Please Enabled javascript for better performance.

महाराष्ट्र राज्याचा लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ साठी बोधचिन्ह रेखाटन स्पर्धा

सध्या सर्व प्रवेशिकांची मूल्यमापन प्रक्रिया समितिमार्फत सुरु ...

See details Hide details
बंद

सध्या सर्व प्रवेशिकांची मूल्यमापन प्रक्रिया समितिमार्फत सुरु आहे

महाराष्ट्र राज्याचा लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ साठी बोधचिन्ह रेखाटन स्पर्धा
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ म्हणजे शासनाने नागरिकांना शासकीय सेवांचा हक्क देण्यासाठी तयार केलेला क्रांतिकारी कायदा. सार्वजनिक सेवा पारदर्शकपणे, कार्यक्षमतेने, कालबद्धरितीने आणि जलद गतीने लोकांना प्रदान करण्याच्या उद्देशाने शासनाने हा कायदा केला. सेवा हक्क कायदा किंवा राईट टू सर्व्हिस (RTS) म्हणून हा कायदा ओळखला जातो.

या कायद्या अंतर्गत आजवर एकूण ३९ विभागांच्या ४६२ सेवा अंतर्भूत करण्यात आलेल्या आहेत. आपले सरकार संकेतस्थळ व मोबाईल अॅप्लिकेशन, ई-महासेवा केंद्र, सेतु केंद्र, आपले सरकार केंद्र याद्वारे या सेवांचा लाभ घेता येतो.

या कायद्याचा प्रचार व प्रसार अधिक प्रभावीपणे करता यावा यासाठी शासन व राज्य सेवा हक्क आयोगामार्फत विविध उपाय योजिले जात आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून नागरिकांच्या सहभागातून बोधचिन्ह रेखाटन स्पर्धा राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग व महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत करण्यात येत आहे.

प्रवेशिका सादर करण्याची अंतिम दिनांक आणि वेळ दिनांक २० मे २०१८ च्या मध्यरात्रीपर्यंत आहे.

विजेत्या स्पर्धकाना पंचवीस हजार रुपयांचे रोख परितोषिक देऊन गौरविण्यात येईल. नियम आणि अटी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

टीप – केवळ ‘महाराष्ट्र मायगव’च्या माध्यमातून सादर केलेल्या प्रवेशिकाच ग्राह्य धरल्या जातील

All Comments
Total Submissions ( 182) Approved Submissions (169) Submissions Under Review (13) Submission Closed.
Reset
169 Record(s) Found

Kalpesh Prakash Angre 4 months 21 hours ago

The Logo defines the map of maharashtra which represents that this scheme will reach every corner of the state. It also represents the people and providing their rights to public service and providing these services efficiently. It also defines how it will help people to progress and enhance. It also has letter म initial letter of Maharashtra. The Orange colour represents maharashtra and symboloizes youth of the state.

PRASHANT TUKARAM KUDKAR 4 months 21 hours ago

maharashtra lokseva kayda logo competition axplaination about logo

Vishwdeep S Mankar 4 months 21 hours ago

बोधचिन्हाचा महत्वाचा उपयोग हा कायद्याचा प्रचार व प्रसार अधिक प्रभावीपणे करता यावा यासाठी असल्यामुळे बोधचिन्ह हे प्रसार माध्यमांशी निगडित असणे आवश्यक होते, रंग उठावदार असणे व तसेच सोईचे असणे महंतांचे होते. याच सगळ्या गोष्टीना विचारामध्ये घेऊनच हे बोधचिन्ह रेखाटणं करण्यात आलेले आहे.

बोधचिन्ह ठळक पणे आणि शासनाशी निगडित असल्यामुळे राष्ट्रधवजातून प्रेरणा घेऊन निळा, नारंगी, हिरवा, आणि पांढरा या रंगांचा उपयोग करण्यात आलेला आहे.

shridhar baburoa nikam 4 months 22 hours ago

AAPALE RAJYA,JALAD,PARADARSHAK VA PRAGAT RAJYA.MAAHARASHTRA RAJYA!

Lalit jain_24 4 months 22 hours ago

महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा 2015 या लोगो मधे दोन व्यक्ती-पहिली व्यक्ती सरकार ,दुसरी व्यक्ती- जनता दाखवली आहेत. सरकारी अधिकारी आणि जनता यांचे संबंध दाखविली आहे.सरकारचे तीन पैलू -1. पहिला गोल है सरकारची कार्यक्षमता दाखवते.2.दूसरा गोल है समयबधता 3.तीसर गोल है -पारदर्शकता दाखवते.
Overall ह्यात अधिकाऱ्यांसाठी तीन पैलू (वरील)दाखविले आहेत जे जनतेला शासकीय कार्यालय मधील कामाला सोईस्कर करेल आणि कामाला वेग,पारदर्शकता,समयबद्धता देईल.