You don't have javascript enabled. Please Enabled javascript for better performance.

Poster Design Contest for Maharashtra’s 4 Crore Tree Plantation Mission 2017

Start Date: 30-06-2017
End Date: 08-07-2017

महाराष्ट्रात २०१७ मध्ये ४ कोटी वृक्षारोपण करण्याच्या ...

See details Hide details
बंद
क्रेडिट तास:
10

महाराष्ट्रात २०१७ मध्ये ४ कोटी वृक्षारोपण करण्याच्या मोहिमेअंतर्गत ‘पोस्टर डिझाईन स्पर्धा’

येत्या १ ते ७ जुलै दरम्यान राज्यात ४ कोटी रोपे लावण्याचा निर्धार राज्यशासनाने केला आहे. वन विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेद्वारे २०१९ पर्यंत ५० कोटी रोपे राज्यभरात लावण्यात येतील व त्याद्वारे राष्ट्रीय वन धोरणानुसार आवश्यक असणारे राज्यातील ३३% क्षेत्र हे देखील हरित केले जाईल.

वृक्षारोपणाची हि मोहीम राज्य शासनाचे ३३ विभाग, विविध शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी, एनएसएस, एनसीसी, रेल्वे व सामान्य जनतेच्या अधिकाधिक सहभागातून राबवली जाणार आहे. महाराष्ट्र वन विभागाने महाराष्ट्र हरित सेना/ ग्रीन आर्मी तयार केली असून त्यातील कार्यकर्ते वृक्षारोपण, वनांचे व वन्यजीवांचे संरक्षण यांसारखी विविध कार्ये करतात. वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र वन विभागाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या पोस्टर डिझाईन स्पर्धेत आपण आवर्जून सहभागी व्हावे हि विनंती! स्पर्धेत सहभागी होऊन आपण अशा पद्धतीचे पोस्टर तयार करावे की जे पाहून अधिकाधिक नागरिक वृक्षारोपण करण्यासाठी पुढे सरसावतील. आपले पोस्टर शासनाकडे सादर करण्याची अंतिम तारीख ३ जुलै, २०१७ असेल याची कृपया नोंद घ्यावी. विजेत्यांचा उचित सन्मान करण्यात येईल.

Click here to read Terms and Conditions and Technical Parameters

Total Submissions ( 3) Approved Submissions (0) Submissions Under Review (3) Submission Closed.