महाराष्ट्र राज्याचा लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ साठी घोषवाक्य स्पर्धा
सध्या सर्व प्रवेशिकांची मूल्यमापन प्रक्रिया समितिमार्फत सुरु ...

सध्या सर्व प्रवेशिकांची मूल्यमापन प्रक्रिया समितिमार्फत सुरु आहे
महाराष्ट्र राज्याचा लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ साठी घोषवाक्य स्पर्धा
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ म्हणजे शासनाने नागरिकांना शासकीय सेवांचा हक्क देण्यासाठी तयार केलेला क्रांतिकारी कायदा. सार्वजनिक सेवा पारदर्शकपणे, कार्यक्षमतेने, कालबद्धरितीने आणि जलद गतीने लोकांना प्रदान करण्याच्या उद्देशाने शासनाने हा कायदा केला. सेवा हक्क कायदा किंवा राईट टू सर्व्हिस (RTS) म्हणून हा कायदा ओळखला जातो.
या कायद्या अंतर्गत आजवर एकूण ३९ विभागांच्या ४६२ सेवा अंतर्भूत करण्यात आलेल्या आहेत. आपले सरकार संकेतस्थळ व मोबाईल अॅप्लिकेशन, ई-महासेवा केंद्र, सेतु केंद्र, आपले सरकार केंद्र याद्वारे या सेवांचा लाभ घेता येतो.
या कायद्याचा प्रचार व प्रसार अधिक प्रभावीपणे करता यावा यासाठी शासन व राज्य सेवा हक्क आयोगामार्फत विविध उपाय योजिले जात आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून नागरिकांच्या सहभागातून घोषवाक्य स्पर्धा राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग व महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत करण्यात येत आहे.
प्रवेशिका सादर करण्याची अंतिम दिनांक आणि वेळ दिनांक २० मे २०१८ च्या मध्यरात्रीपर्यंत आहे.
विजेत्या स्पर्धकाना पंचवीस हजार रुपयांचे रोख परितोषिक देऊन गौरविण्यात येईल.
नियम आणि अटी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
टीप – केवळ ‘महाराष्ट्र मायगव’च्या माध्यमातून सादर केलेल्या प्रवेशिकाच ग्राह्य धरल्या जातील