You don't have javascript enabled. Please Enabled javascript for better performance.

Tagline contest for ‘Supportive Healthcare System for Students in Ashram Schools & Eklavya Schools

Start Date: 21-08-2018
End Date: 16-09-2018

आदिवासी लोकसंख्येचा विचार करता महाराष्ट्र देशातील दुसऱ्या ...

See details Hide details
बंद
क्रेडिट तास:
5

आदिवासी लोकसंख्येचा विचार करता महाराष्ट्र देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे आणि त्यांच्या विकासाला सरकारने नेहमीच प्राधान्य दिले आहे. आदिवासी जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या शिक्षण, आरोग्य, जीवनमान इत्यादी सामाजिक विकास दर्शवणाऱ्या घटकांमध्ये सुधारणा घडवून आणणे गरजेचे आहे. याच उद्देशाने आदिवासी विकास विभागामार्फत गेल्या काही दशकांपासून सरकारी आश्रमशाळा चालवण्यात येत आहेत.  सध्याच्या घडीला राज्यभरातील २ लाख आदिवासी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ५०२ सरकारी आश्रमशाळा आणि १६ एकलव्य मॉडेल निवासी शाळा कार्यरत आहेत.

सरकारी आश्रमशाळा आणि एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधल्या पायाभूत सुविधा सुधारून आदिवासी विकास विभाग येथील विद्यार्थ्यांना आपुलकीच्या वातावरणात शिक्षण मिळावे यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहे. जवळपास १०० सरकारी आश्रमशाळा या आता आयएसओ प्रमाणित झाल्या आहेत. यापैकी बऱ्याच शाळांत आता ‘दिव्यांग’ पूरक आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी डिजिटल वर्गखोल्यांसह शाळेची नवीन इमारत, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृह, दैनंदिन जेवणासाठी स्वतंत्र जागा असलेले स्वयंपाकघर, ४ बेड असलेले उपचारगृह, खेळाचे मैदान या सुविधांवर विशेष भर देण्यात आला आहे.

सध्या ‘राष्ट्रीत बाल स्वास्थ कार्यक्रम’ अंतर्गत विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे सार्वजनिक आरोग्य खाते लक्ष देत आहे. त्यांच्या याच कार्यक्रमाला जोड म्हणून आदिवासी विकास विभागाने  काही महत्त्वपूर्ण बाबींवर विशेष लक्ष देऊन एक एकात्मिक आरोग्य सेवा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. ही पर्यायी आरोग्य सेवा यंत्रणा ३ महत्त्वाच्या आरोग्य सेवा घटकांवर लक्ष केंद्रित करेल. ज्यात आपत्कालीन वैद्यकीय सेवा, नियमित वैद्यकीय तपासणी आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या आरोग्य अहवालाची नोंद राखणे या घटकांचा समावेश आहे. 

या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी ५-१० शाळांचा समावेश असलेले समूह तयार करण्यात आले आहेत. सर्व सरकारी आश्रमशाळा ४८ समूहांमध्ये विभागण्यात आल्या आहेत. या एकात्मिक आरोग्य सेवा उपक्रमामध्ये खालील बाबींचाचा समावेश असेल.

  1. आयुष डॉक्टर असलेली १०८ आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा
  2. विद्यार्थ्यांसाठी नियमित वैद्यकीय तपासणी
  3. प्रत्येक विद्यार्थ्याच्या वैद्यकीय अहवालाची नोंद
  4. विद्यार्थ्यांच्या आरोग्य स्थितीचे नियतकालीक विश्लेषण
  5. उपचारगृहांचे नुतनीकरण
  6. आरोग्य शिक्षण
  7. गंभीर आजाराने ग्रस्त विद्यार्थ्यांचे व्यवस्थापन
  8. समाज प्रबोधान कार्यक्रम 
  1. आरोग्यसेवा यंत्रणेच्या सर्व घटकांचे सनियंत्रण करण्यासाठी यंत्रणा

 

या उपक्रमाला साजेसे घोषवाक्य सुचवण्याकरिता महाराष्ट्र सरकारच्या आदिवासी विकास विभागामार्फत नागरिकांना स्पर्धेत सहभागी होण्यास आमंत्रित केले जात आहे.

प्रवेशिका सादर करण्याची अंतिम दिनांक १५ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत आहे.

विजेत्याचा ‘अॅमेझॉन किंडल’ देऊन गौरव केला जाईल

नियम आणि अटी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

टीप - महाराष्ट्र मायगवच्या माध्यमातून सादर केलेल्या प्रवेशिकांचाच स्पर्धेसाठी विचार केला जाईल.

 

 

Total Submissions ( 106) Approved Submissions (0) Submissions Under Review (106) Submission Closed.